
भारतीय प्रजासत्ताक दिन सर्वत्र साजरा, शाळा महाविद्यालये गजबजली..
घरोघरी राष्ट्रगीताचे स्वर निनादले, सर्वत्र वातावरण जनगनमन मय झाले.
अगदी पहाटे पासून बाल गोपाल, गावकरी शाळा महाविद्यालये आणि ग्रामपंचायतीच्या प्रांगणात दाखल.
जय हिंद जय भारत
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा, आज 26 जानेवारी आजच्याच दिवशी 1950 ला भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना झाली आज भारतीय संविधान देशात लागू झाले. ज्ञात अज्ञात कोट्यावधी भारतीयांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशासह भारतात आजच्याच दिवशी सर्वत्र झेंडावंदन करण्यात येते. आज छत्रपती संभाजीनगरात ग्रामीण तसेच शहरी भागातही अगदी पहाटेपासून ध्वजारोहण करण्यात आले. हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन झेंड्याला सलामी दिली सर्वत्र राष्ट्रगीत जन गण मन गायन करण्यात आले.शहरातील भावसिंगपुरा भागातील, ज्ञानसंपदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शाळेचे प्राचार्य आणि विश्वस्तांनी झेडावंदन केले आणि आपला शुभेच्छा संदेश दिला